मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश
न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथे बायपाय दुपदरीकरण रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून दर्जाहीन अवस्था झाली होती. पुर्ण रस्त्यात खड्डे पडून वाहन चालकांना गाडी चालवताना ञास होत होता , अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते, त्यात गॅस पाईप लाईन खोदाईमुळे रस्त्याची साईड पट्टी पण खराब झाली होती. यात रस्ता पुर्णतः खराब झाला होता त्यामुळे दोन वर्ष या रस्त्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला होता.आता या रस्त्याचे काम सुरू झाले असून ग्रामस्थांनी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.हा रस्ता लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावा आणि रस्ता सुरळीत लोकांसाठी चालु करावा, अशी मागणी मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब यांनी केली.रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू केले म्हणून मळगाव मनसे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी पुष्पगुष्छ देऊन सर्व हायवे अधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्यासह विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष साहील तळकटकर, शतायु जाभळे,ओंकार नवार,जय राऊळ, महेंद्र कांबळी, विशाल राऊळ,आशितोष राऊळ उपस्थित होते.









