कोल्हापूर :
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवऊन धमकी देतत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी दाखल गुह्यातील संशयीत प्रशांत कोरटकर (रा. नागपूर) याच्या अंतरिम जामिनअर्जावर बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोरटकरने न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला. तसेच कोरटकरच्या अंतरिम जामिनप्रकरणी पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे. त्यामुळे कोरटकरला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
संशयीत कोरटकरने इतिहास संशोधक सावंत यांना फोन करून, अर्वाच्च भाषेचा वापर करीत, धमकी दिली होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीही आक्षेपार्ह शब्दांत टिपण्णी केली होती. या संपूर्ण प्रकरणाच्या संभाषणाची क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. तसेच संशयीत कोरटकरला अटक करून, त्याला कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होता संशयीत कोरटकरने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनअर्ज दाखल कऊन, अंतरिम जामिन मिळवून घेतला होता. अंतरिम जामिनअर्जाची मुदत संपण्यापूर्वी पोलिसांनी संशयीत कोरटकरने सुनावणीवेळी प्रत्यक्षात न्यायालयात उपस्थितीत राहण्याविषयी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. या पोलिसांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने सुनावणीअंती फेटाळून लावलीत, पुढील सुनावणी 17 मार्चला जाहिर केली.








