जयपूर
राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठाने 13 वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपाताची अनुमती दिली आहे. पीडितेला अपत्याला जन्म देण्यास भाग पाडण्यात आल्यास तिला आयुष्यभर मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागेल, याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वैद्यकीय समिती स्थापन करत गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असा निर्देश न्यायाधीश सुदेश बंसल यांच्या खंडपीठाने महिला चिकित्सालयाच्या अधीक्षकांना दिला आहे.









