मसुरे । प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मसुरे केंद्रशाळेमध्ये शिक्षण विभागाने सावळा गोंधळ घातला आहे. एक ते आठ वर्ग असलेल्या या प्रशालेमध्ये आदल्या दिवशी कायम असलेले दोन शिक्षक त्याच प्रशालेत दुसऱ्या दिवशी कामगिरीवर काढण्यात आले . तर एका शिक्षकाची चक्क बदली करून त्यांना तेथून स्थानिक समिती , ग्रामस्थांना अंधारात ठेवून कार्यमुक्त केले आहे. आता या प्रशालेत फकत एक शिक्षक कायमस्वरूपी असून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत या भागाचे आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे , त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी सांगून ग्रामस्थांसह आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.









