मुंबई :
चीनी मोबाईल कंपनी रियलमी यांनी भारतामध्ये अल्ट्रा मॉडेल पी-3 सिरिज अंतर्गतचे स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. लाँच संदर्भातील तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रियलमी पी-3 अल्ट्रा 5जी स्मार्टफोन विविध वैशिष्ट्यांसह सादर केला जाणार आहे. मीडीयाटेक डायमेंसीटी 8300 ची चीपसेट यामध्ये दिली जाणार असून 6.7 इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. यामध्ये ड्युअल कॅमेरा असणार असून एक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आणि दुसरा 12 मेगापिक्सलचा असणार आहे.
फोनमध्ये 6000 एमएएचची बॅटरी दिली जाणार असून 80 डब्ल्युचा चार्जर दिला जाणार आहे. अॅन्ड्रॉईड 15 यावर हा मोबाईल चालणार आहे. मागच्या महिन्यामध्ये रियलमीने पी-3 सिरीजचे स्मार्टफोन लाँचे केले होते. यामध्ये पी-3 5जी आणि पी-3 एक्स 5जी मॉडेलचा समावेश होता.









