कोल्हापूर
छत्रपती शिवरायांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला ११ मार्च पर्यंत अंतरिम जामीन अर्जाची मुदत आहे, राज्य सरकारने कोरडकर चा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा रस्त्यावरची लढाई केली जाईल असा इशारा इंडिया आघाडीच्या वतीने आज देण्यात आला. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेतली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम जामीन रद्द करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितलं होतं, जामीन अर्ज रद्द करण्यासाठी पोलिसांनीही ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी शिष्टमंडळाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे करण्यात आली. यावेळी हर्षल सुर्वे, विजय देवणे, आर के पवार, वसंतराव मुळीक, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव विशाल देवकुळे उपस्थित होते.








