कंपनी 6,200 कोटी रुपये उभारणार ट्रस्टकडे उच्च दर्जाचे ऑफिस
मुंबई : सत्व डेव्हलपर्स आणि ब्लॅकस्टोन-प्रायोजित नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट आयइआयटी यांनी आयपीओतून 6,200 कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे अर्जसंबंधीची कागदपत्रे सादर केली आहेत. नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट भारतातील उच्च दर्जाचे ऑफिस पोर्टफोलिओचे मालक आणि व्यवस्थापक आहे. इश्यूचा 75 टक्के पर्यंतचा हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल. इश्यूचा किमान 25 टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटपासाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे होणार ऑफिस
सूचीबद्ध झाल्यानंतर, नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट आरइआयटी हे ग्रॉस अॅसेट व्हॅल्यू आणि नॉन-ऑपरेटिंग इन्कमच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे ऑफिस आरइआयटी राहणार असून, ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे कार्यालय ठरणार आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सहा शहर-केंद्रित ऑफिस इमारती आणि 24 बिझनेस पार्क समाविष्ट आहेत. या मालमत्ता हैदराबाद, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, गुरुग्राम आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये गिफ्ट सिटीमध्ये धोरणात्मकरित्या सामायिक केल्या आहेत.









