काही तासातच गमवावे लागले पद
लंडन : ब्रिटनमधील न्युझीलंडचे राजदूत फिल गोफ यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. गोफ यांनी लंडनमध्ये एका चर्चेदरम्यान दुसऱ्या महायुद्धाविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धारणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गोफ यांच्या टिप्पणीनंतर न्युझीलंडचे विदेशमंत्री विंस्टन पीटर्स यांनी त्यांना परत बोलाविले जाणार असल्याचे म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध समाप्त करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांची तुलना 1938 च्या म्युनिच कराराशी गोफ यांनी केली. या कराराने हिटलरला चेकोस्लोवाकियावर कब्जा करण्याचा मार्ग मोकळा केला होता. सर विंस्टन चर्चिल यांनी या करारावर टीका केली होती. ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये चर्चिल यांचा पुतळा पुन्हा बसविला आहे, परंतु ट्रम्प हे खरोखरच इतिहास समजून घेत असल्याचे वाटत नाही अशी टिप्पणी गोफ यांनी केली.









