कोल्हापूर :
करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी एका भाविकाने नाव न सांगण्याच्या अटीवर बुधवारी सहा तोळे वजनाचे सोन्याचे बाजूबंद अर्पण केले. मंदिरात देवीच्या चरणी हे बाजूबंद अर्पण करून ते देवस्थन व्यवस्थापन समितीच्या खजिनदारांकडे सुपुर्द करण्यात आले, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
अंबाबाई चरणी पैशासह चांदी, सोन्याचे दागिने भाविकांकडून अर्पण केले जातात. अशाच एका भाविकाने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल 6 तोळे वजनाचे सोन्याचे बाजूबंद अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण केले. अंबाबाईवर असलेली भक्ती आणि देवीच्या सेवेतून त्यांना आलेली प्रचिती, यातूनच आपण हे दागिने देविला अर्पण करीत असल्याचे संबंधित भाविकाने देवस्थान व्यवस्थापन समितीला सांगितले.
देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव नाईकवाडे यांच्या कार्यालयात येऊन त्या भाविकाने त्यांना बाजूबंद देवीच्या चरणी अर्पण करण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर हे बाजूबंद अंबाबाईच्या चरणी अर्पण केले. काही वेळाने हे बाजूबंद सुरक्षिततेच्या दृष्टीने नाईकवाडे यांनी खजीनदाराकडे सुपुर्द केले.








