लवकरच सुरू होणार चित्रिकरण
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. परंतु हा चित्रपट रोहितच्या कॉप यूनिव्हर्सचा हिस्सा नसेल.
या चित्रपटाच्य कहाणीवर सध्या काम सुरू आहे. रोहित अन् जॉन या चित्रपटाचे चित्रिकरण एप्रिल महिन्यात सुरू करणार असल्याचे समजते. रोहितचा हा चित्रपट मुंबई पोलीस विभागाचे माजी आयुक्त राकेश मारिया यांचा बायोपिक असल्याची चर्चा आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण 45 दिवसांपर्यंत चालणार आहे. अभिनेता आणि दिग्दर्शकाने संभाव्य तारखांवर चर्चा केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणानंतर रोहित हा खतरों के खिलाडी 15 च्या चित्रिकरणासाठी रवाना होणार आहे. तर जॉन हा ऑगस्ट महिन्यात आइल ऑफ मॅनवरील स्वत:च्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे.









