रत्नागिरी :
कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाची धुम सुऊ झाली आह़े त्यातच मुंबई–पुण्यातील चाकरमान्यांना गावचे वेध लागले आहेत़ यासाठी एसटी प्रशासनही चाकरमान्यांना त्यांच्या गावात सुखऊप पोहचविण्यासाठी सज्ज झाले आह़े 8 मार्चपासून एसटीच्या विशेष जादा गाड्यांची सोय करण्यात आली आह़े आतापर्यंत त्नागिरी विभागातून 48 गाड्यांचे नियोजन करण्यात आल़े गरजेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
रत्नागिरी विभागाच्या दापोली आगारातून 9, खेड 9, चिपळूण 5, गुहागर 5, देवऊख 5, रत्नागिरी 4, लांजा 1 राजापूर 3 व मंडणगड 7 आदी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आह़े या सर्व बस साध्या प्रकारातील असणार आहेत़ महिलांना 50 टक्के सवलत असणार आह़े यावर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े विशेष म्हणजे 13 तारखेला होळी असून 14 तारखेला धुळवड असणार आह़े यानंतर 15 तारखेला शनिवार, 16 तारखेला रविवार आह़े त्यामुळे जोडून सुट्ट्या आल्याने चाकरमान्यांसाठी सोयीचे ठरणार आह़े








