रत्नागिरी :
शहरातील परटवणेनाका येथे दुचाकीचालकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा ही घटना रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडल़ी हर्षद धुळप, सुमित धुळप व सुयोग धुळप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़
यश मंगेश शिवलकर (20, ऱा सड्यो, शिवलकरवाडी) असे मारहाण करण्यात आलेल्या दुचाकीचालकाचे नाव आह़े यश हा 2 मार्च रोजी दुचाकी (एमएच 08 एआर 9048) घेवून परटवणेनाका येथून जात होत़ा सायंकाळी 6च्या सुमारास यश याच्या दुचाकीची एका लहान मुलीला धडक बसल़ी याचा राग येवून संशयित आरोपीनी यश याला मारहाण केली, अशी तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली आह़े.








