एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद
बेळगाव : आर्थिक व्यवहारातून सदाशिवनगर येथून एका तरुणाचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी मंगळवार दि. 4 रोजी एपीएमसी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून विश्वजीत सतीश हिंडलगेकर (रा. शिवालय रोड, सदाशिवनगर) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋतुराज बिडीकर (रा. संतिबस्तवाड) याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अपहृत विश्वजितचे वडील सतीश लक्ष्मण हिंडलगेकर यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. विश्वजीत आणि ऋतुराज या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. याच कारणातून मंगळवारी सकाळी 8.40 च्या दरम्यान ऋतुराज याने विश्वजीतला सदाशिवनगर येथून आपल्या मोटारसायकलवर बसवून घेऊन अपहरण केले आहे. त्यामुळे या प्रकरणी विश्वजीतचे वडील सतीश यांनी एपीएमसी पोलीस स्थानक गाठून आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. आर्थिक व्यवहारातून हे अपहरण घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक उस्मान अवटी पुढील तपास करीत आहेत.









