वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 29 ते 31 मार्च दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण 16 देशांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा केंद्रीय क्रीडा खाते आणि योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने भरविली जाणार आहे.
या स्पर्धेला आशियाई ऑलिम्पिक मंडळ तसेच विश्व योगासन, आशियाई योगासन आणि योगासन इंद्रप्रस्थ यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. योग विद्येचा जन्म भारतात झाला असल्याने या स्पर्धेला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर माहिती आशियाई योगासन संघटनेचे अध्यक्ष संजय मालपाणी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.









