खेड :
तालुक्यातील काडवली–गजवाडी येथे नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदाईसाठी ठेवलेले 10 लाख रुपये किंमतीचे जेसीबी कंपनीचे ब्रेकर मशीन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. ही घटना 1 ते 2 मार्च या कालावधीत घडल्याचे प्रल्हाद प्रकाश लाड यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
लाड यांच्या मालकीचे जेसीबी मशीन नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदाई कामासाठी ठेवले होते. तीन टन वजनाच्या मशीनसह इतर पार्ट अज्ञात चोरट्याने लांबवले. मशीन व पार्ट चोरीस गेल्याचे निदर्शनास येताच पोलीस स्थानक गाठून तक्रार नोंदवली. या बाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.








