वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या लॉरेस विश्वक्रीडा पुरस्कारासाठी भारताचा यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 2022 च्या डिसेंबरमध्ये झालेल्या वाहन दुर्घटनेत ऋषभला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचे क्रिकेटमधील पुनरागमन दणक्यात झाले होते.
जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये लॉरेस विश्वा पुरस्कार हा प्रतिष्ठेचा समजला जातो. यापूर्वी भारताचा माजी जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. 2011 साली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली होती आणि या संघामध्ये सचिनची कामगिरी दर्जेदार झाली होती. सचिनला या कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा लॉरेस क्रीडा पुरस्कार देण्यात आला होता. 2025 सालातील लॉरेस विश्वक्रीडा पुरस्कारासाठी ऋषभ पंत, ब्राझीलची जिमनॅस्ट रिबेका अंद्रादे, अमेरिकन जलतरणपटू कॅलेब ड्रेसेल, स्वीसचा स्काय रेसर, लारा बेहरमी, स्पेनचा मोटार सायकल रेसर मार्क मारक्वेझ आणि ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू अॅरिमे टिटमुशेव्ह यांच्यात चुरस राहिल. 2025 च्या लॉरेस विश्वक्रीडा पुरस्कार विजेत्याची घोषणा 1 एप्रिल रोजी केली जाईल.









