वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2007 च्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू तसेच हरियाणा पोलीस खात्यातील डीएसपी जोगिंदर शर्माने साईचे आभार मानले आहे. दिल्लीमध्ये प्रत्येक रविवारी फिट इंडिया सन्डेज सायकलिंग कार्यक्रम नियमितपणे घेतला जातो. या कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रित केल्याबद्दल जोगिंदर शर्माने साईचे आभार मानले आहे.
रविवारी फिट इंडिया सन्डेज सायकलिंग कार्यक्रमाला मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमपासून प्रारंभ करण्यात आला. यामध्ये 40 वर्षीय जोगिंदर शर्माने आपला सहभाग दर्शविला. जोगिंदर शर्माने सायकलिंग करत या कार्यक्रमाला आपला पाठिंबा व्यक्त केला. 2007 साली 40 वर्षीय जोगिंदर शर्मा हरियाणा पोलीस खात्यामध्ये क्रिकेटपटू म्हणून दाखल झाला. 2023 साली जोगिंदरसिंग शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती पत्करली होती. जोगिंदर शर्माने 2004 ते 2007 या कालावधीत 4 वनडे आणि 4 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.









