3500 कोटी रुपये होणार खर्च
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
शेजारी देश भूतान लवकरच भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडला जाणार आहे. आसामच्या कोक्राझार पासून गेलेफूपर्यंत रेल्वेमार्ग निर्माण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला आहे. याबाबतची माहिती नॉर्थइस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी दिली आहे. प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थळाचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाला आहे. आता डीपीआरच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. प्रस्तावित 69.04 किलोमीटर लांब रेल्वेमार्ग आसामच्या कोक्राझार स्थानकाला भूतानच्या गेलेफूशी जोडणार आहे. याकरता 3500 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अनुमान असल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे.
6 स्थानके, 65 छोटे पूल
या प्रकल्पात 6 स्थानके असतील, ज्यात बालाजन, गरुभासा, रुनिखाता, शांतिपूर, दादगिरी आणि गेलेफू सामील आहे. पायाभूत प्रकल्पात दोन महत्त्वपूर्ण पूल, 29 प्रमुख पूल, 65 छोटे पूल, एक रोड-ओव्हर ब्राज, 39 रोड अंडर ब्रिजा आणि 11 मीटर लांबीचे दोन विद्युतील पूल सामील आहेत. अंतिम स्थळाचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. आता डीपीआरला पुढील मंजुरी आणि आवश्यक निर्देशांसाठी सादर करण्यात आल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
प्रस्तावित रेल्वेमार्ग भारत-भूतान संबंधांना महत्त्वपूर्ण स्वरुपात मजबूत करणार आहे, यामुळे व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक आदान-प्रदान वाढणार आहे. संपर्कव्यवस्थेत यामुळे सुधारणा होणार आहे. भूतानला यामुळे पहिला रेल्वेमार्ग प्रदान होणार असल्याने अडथळेरहित परिवहन सुविधा उपलब्ध होणार आहे. हा रेल्वेमार्ग बोडोलँड टेरिटोरियन रिजनला व्यापार अन् पारगमन केंद्राच्या स्वरुपात स्थापित करेल, यामुळे स्थानिक व्यवसाय आणि समुदायांना लाभ होणार आहे. पंतप्रधानांच्या अॅक्ट ईस्ट धोरणाच्या अनुरुप हा प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे.









