वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आपली प्रकृती तंदुरुस्त राखण्याचे आवाहन करताना प्रत्येक रविवारी सायकलिंग करण्याचा उपदेश केला आहे. पंतप्रधानांच्या ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या मोहीमेला ऑलिम्पिक पदक विजेता अॅथलिट निरज चोप्राने पाठिंबा दर्शविला आहे.
सायकलिंग केल्यानंतर प्रकृती तंदुरुस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकी रविवारी देशातील नागरिकांनी सायकलचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले असून देशातील पर्यावरण अबाधित राहण्यास मदत होते. या मोहीमेला 17 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीमध्ये क्रीडा युवजन खात्याचे मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला होता. आता प्रत्येक रविवारी दिल्लीमध्ये नागरिक सायकलिंग करण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसून येते.









