अमृतसर :
येथील विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला 8.17 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह शनिवारी पकडले. सदर प्रवाशाचे नाव मनदीप सिंग असे असून तो मलेशियाहून आला होता. झडतीदरम्यान, त्याच्या बॅगेत गांजासारखे 8.17 किलो अमली पदार्थ आढळून आले. त्याची किंमत सुमारे 8.17 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. मनदीप सिंगविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट, 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









