लोकसंख्येचा मुद्दा चर्चेत येताच भारत आणि चीन या देशांचे नाव समोर येते. हे दोन्ही देश लोकसंख्येप्रकरणी इतरांपेक्षा खूपच पुढे आहेत. परंतु काही देश असे देखील आहेत, ज्यांची लोकसंख्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिह्यूच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
नाउरू : या देशाची लोकसंख्या केवळ 12 हजार 884 आहे. येथील लोकसंख्या वृद्धी दर 1.21 टक्के आहे. याला जगातील सर्वात छोटे प्रजासत्ताक देखील म्हटले जाते, या देशाकडे 21 चौरस किलोमीटर भूभाग आहे. येथील कमी लोकसंख्येचे कारण आर्थिक आव्हाने आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या अभावाला मानले जाते.
तुवालू : 9 छोट्या बेटांना मिळून देश ठरलेल्या तुवालूत राहणाऱ्या लोकांची संख्या केवळ 11 हजार 478 आहे. या देशाकडे 26 चौरस किलोमीटरचा भूभाग आहे. व्यापारी मार्गांपासून असलेले अंतर याच्या कमी लोकसंख्येचे एक कारण असल्याचे मानले जाते.
वॉलिस अँड फुटुना : दक्षिण प्रशांतच्या या क्षेत्रात तीन छोटी बेटं आहेत. याचे एकूण क्षेत्रफळ 142 चौरस किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या 11 हजार 439 इतकी आहे.
सेंट बार्थेलेमी : 25 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ असलेल्या सेंट बार्थेलमीमध्ये 11 हजार 19 लोक राहतात. येथे मोठे उद्योग किंवा शेतीच्या जागी आलिशान पर्यटनावर लक्ष केंद्रीत केले जाते, यामुळे येथे कमी लोकसंख्या असल्याचे मानले जाते.
सेंट पियरे अँड मिकियोन : क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा अत्यंत लहान देश आहे. या देशाची लोकसंख्या केवळ 5 हजार 815 इतकीच आहे. उद्योगांचा अभाव असल्याने येथील लोकसंख्या कमी असल्याचे मानण्यात येते.
मॉन्टसेराट : 90 च्या दशकात झालेल्या एका ज्वालामुखी विस्फोटाने येथे मोठा विध्वंस घडवून आणला होता. ज्यानंतर येथील लोकांनी मोठ्या संख्येत पलायन केले होते. सध्या येथे केवळ 4 हजार 372 लोक राहतात.
फॉकलँड आयलँड : येथे राहणारी जवळपास 3500 लोकसंख्या प्रामुख्याने मासेमारी अन् पर्यटनावर निर्भर आहे. फॉकलंड आयलँडवरील प्रतिकूल हवामानामुळे अधिक संख्येत लोक राहत नसल्याचे मानले जाते.
नियू : 260 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ असलेला नियू हा देश प्रशांत क्षेत्रात आहे. या देशात सुमारे 1935 लोक राहतात.
तोकलू : जवळपास 1915 लोकसंख्या असलेला तोकलू एकूण 26 चौरस किलोमीटरमध्ये वसलेला आहे. येथे समोआद्वारे नौकेतून जाता येऊ शकते.
व्हॅटिकन सिटी : याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशाचा दर्जा प्राप्त आहे. येथील लोकसंख्या 764 आहे. 49 हेक्टरयुक्त या छोट्या स्थानी कठोर कायद्यांमुळे फारशी लोकसंख्या नसल्याचे समजते.









