दापोली :
पुणे येथील स्वारगेट एसटी स्थानकातील बसमध्ये घडलेला निंदनीय प्रकार हा महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर व कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की आरोपीला लवकरात लवकर पकडले जावे व त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यासाठी आपण पुणे येथे गेलेलो होतो. यावेळी पोलिसांनी आपल्याला जी माहिती सांगितली ती माहिती आपण पत्रकार परिषदेत सांगितली. मात्र विरोधकांकडून माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
आपले सरकार हे लाडक्या बहिणींचे सरकार आहे. महिलांचा सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकता उपाय योजना करण्याच्या सूचना यंत्रणेला आपण जिथे जिथे जातो तेथील तिथे तिथे देत असतो. विरोधकांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.








