यशवर्धन हा सुपरस्टार गोविंदा आणि सुनिता अहुजा यांचा मुलगा आहे. यशची मोठी बहीण टीना अहुजा, तिनेही एक व्हिडीओ सॉंगमधून बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले आहे.  

यशवर्धनच्या हॅण्डसम लुक्समुळे त्याला रणबीर कपूर, ह्रितीक रोशन यांच्यासोबत नेहमीच कंपेअर केले जात आहे. 

यशवर्धन लवकरच एका रोमॅंटीक सिनेमातून लॉन्च होणार आहे. यशवर्धन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक साई राजेश यांच्यासोबत चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे. हा सिनेमा मधू मंतेना आणि अलु अरविंद यांची निर्मिती असणार आहे. 

या सिनेमातील हिरोईनसाठी मुकेश छाब्रा यांना तब्बल १४ हजार ऑडीशन्स आल्या आहेत. लवकरच या सिनेमाचे शुटींग सुरु होईल.

यशवर्धन अहुजा याचा जन्म १ मार्च १९९७ ला झाला. त्याने लंडन येथील मेट फिल्म स्कूल येथे अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्या आधी ढीशूम, किक-२ , तडप यांसारख्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. यशवर्धनला अभिनया व्यतिरिक्त वाचनाची आणि प्रवासाची आवड आहे.