परिवहनचा निर्णय : हॉल तिकिटाद्वारे घेता येणार लाभ
बेळगाव : दहावी-बारावी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. येत्या 1 मार्चपासून बारावी तर 21 मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे. याकाळात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचताना अडचणी येऊ नयेत, यासाठी परिवहनने हा निर्णय घेतला आहे. शहर आणि ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना हॉलतिकीट दाखवून हा प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील काही परीक्षा केंद्रे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहेत. अशा ठिकाणी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. परीक्षाकाळात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राजवळ बस थांबविण्याची विनंती केल्यास त्यांना सहकार्य करावे, अशी सूचना बसचालक व वाहकांना केली आहे. विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट दाखवून विनामूल्य प्रवास करावा, असे आवाहन परिवहनने केले आहे.परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी परिवहनने ही व्यवस्था केली आहे. ग्रामीण व दुर्गम भागात ही विनामूल्य बससेवा सोयीस्कर ठरणार आहे.









