122 रक्तदात्यांनी केले रक्तदान
बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. सूरज जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण 122 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. सूरज जोशी म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. एका वेळच्या रक्तातून अनेकांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करावे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, बेळगाव विभागीय व्यवस्थापक मधुकर कुलकर्णी, केएलई हॉस्पिटलचे डॉ. माने उपस्थित होते.
पंढरी परब म्हणाले, लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. केएलई हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबिर अनेक वर्षांपासून होत असून यामुळे अनेकांना जीवदान दिले आहे. समाजाच्या सेवेसाठी लोकमान्य कायम तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, सुबोध गावडे यांनी प्रथमत: रक्तदान केले. त्यांच्यासोबत लोकमान्य सोसायटीचे कर्मचारी, अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य सोसायटीचे पीआरओ सत्यव्रत नाईक यांनी केले.









