सोशल मीडिया चॅलेंज स्वीकारणे अंगलट
ब्राझीलमध्ये 14 वर्षीय मुलाने सोशल मीडिया चॅलेंज अंतर्गत एका फुलपाखराला चिरडून त्याच्या लिक्विडला सीरिंजमध्ये भरले आणि ते स्वत:च्या शरीरात इंजेक्ट केले आहे. यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथे 7 दिवसांपर्यंत भरती राहिल्यावर त्याचा मृत्यू झाला आहे. एका घातक ऑनलाइन आव्हानाच्या अंतर्गत चिरडलेल्या फुलपाखराचे इंजेक्शन लावून घेतल्याने मुलाचा मृत्यू झाला. ब्राझीलच्या या मुलाने डॉक्टरांसमोर आपण एक फुलपाखरू पायांनी चिरडले होते आणि मग त्याच्या शरीरातून निघालेले लिक्विड इंजेक्शनमध्ये भरून शरीरात इंजेक्ट केल्याचे मान्य केले.
बिघडली प्रकृती
हा प्रकार करताच त्याला उलटी होण्यास सुरुवात झाली आणि तो चालताना अडखळत असल्याने वडिलांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे त्याची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला भरती करून घेतले होते. विटोरिया दा कॉन्क्विस्टा जनरल हॉस्पिटलमध्ये तो सात दिवसांपर्यंत तज्ञांच्या देखरेखीत होता.
सोशल मीडिया चॅलेंजची चौकशी
पोलिसांनी हे विचित्र कृत्य सोशल मीडिया ट्रेंडचा हिस्सा होते का ही शक्यता विचारात घेत चौकशी सुरू केली आहे. हा मुलगा एका प्रयोगाची नक्कल करत होता, ज्याविषयी त्याला ऑनलाइन कळले होते असा दावाही केला जातोय. परंतु त्याने स्वत:च्या मृत्यूपूर्वी हा दावा नाकारला होता असे समजते. त्याने औषधाचे इंजेक्शन घेतल्याचे सांगितले होते, त्याने एका केमिस्टकडून औषध खरेदी केले होते, तर एका मृत फुलपाखराला पाण्यात मिसळत आणि ते इंजेक्शनमध्ये भरत उजव्या पायात इंजेक्ट केले होते. त्याने हे मिश्रण कसे तयार केले किंवा शरीरात किती प्रमाणात इंजेक्ट केले हे त्याने सांगितले नाही. कदाचित इंजेक्शनमधून हवा आत गेल्याने एम्बोलिज्म झाला असण्याची शक्यता असल्याचे हॉस्पिटलचे तज्ञ लुईज फर्नांडो डी रेल्वास यांनी सांगितले.
उशीखाली मिळाली सीरिंज
मुलाच्या वडिलांना घराची सफाई करताना त्याच्या उशीखाली वापरण्यात आलेली सीरिंज मिळाली. विषारी घटकांमुळे त्याचे अवयव निकामी झाल्याची शक्यताही पोलीस विचारात घेत आहेत.









