मालवण प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील धामापूर गावचे सुपुत्र तथा माजी विधान परिषद आमदार श्री. सुभाष चव्हाण ( वय 78 ) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबई येथे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने धामापूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातंवंडे असा परीवार आहे. सुभाष चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार म्हणून काम करताना धामापूर गावाला पर्यटनदृष्ट्या नावलौकिक मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच धामापूर तलाव परिसराचा पर्यटनास आवश्यक असा सर्वांगीण विकास करण्यावर विशेष भर दिला. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि योगदानामुळे धामापूर गाव पर्यटनदृष्ट्या आज जगभर प्रसिद्ध आहे.
Previous Articleइंस्टाग्रामवरील मेसेजवरून इचलकरंजीत दोन गटात हाणामारी
Next Article अफगाणिस्तान संघाने स्पर्धेत रंग भरला!









