कोल्हापूर
गेल्या पाच दिवसांपूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एसटी महामंडळाच्या वाहकाला आणि एस टी ला कानडी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं होतं. यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक एस टी सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले होते. दरम्यान आजपासून या बस सेवेला पुन्हा सुरुवात झाली असून पोलीस बंदोबस्तात ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.









