कोल्हापूर / दीपक जाधव :
कोल्हापूर महानगर पालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या मोफत अंत्यसंस्कारा मध्ये विद्युत दाहीनी पेक्षा लाकडा वरील अंत्यसंस्काराला प्राधान्य देत असल्याने विद्युत दाहिनीचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या शनिवारी कोल्हापूर मधील प्रसिद्ध सर्जन डॉ.सुभाष आठल्ये याचे निधन झाले त्याच्यावर विद्युत दिहीनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.विद्युत दाहिनी बसवल्यानंतर गेल्या महीन्याभरातील अंत्यसंस्कार करण्यात आलेला पाचवा मृतदेह आहे.पालिकेने म1 कोठी 20 लाख खर्च करुन विद्युत दाहीनी बसवली असून कोल्हापूर मध्ये मात्र त्याच्या वापरा बद्दल अनास्था दिसुन येत आहे.
विद्युतदाहीनी मधील अंत्यसंस्कार हे मोफत व प्रदुषण विरहित असूनही त्याला मिळणारा प्रतिसाद हा अत्यल्प आहे.पालिकेकडून स्थापनेपासूनच मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्यात येत असून यात 160 किलो लाकूड, 500-800 शेणी पालीके कडून मोफत दिल्या जातात.तर महीन्या काठी पंचगंगा स्मशानभूमीत 350-400 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात.मात्र पर्यावरण पुरक अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून पालिकेने सन पथम गस दाहिनी बसवली त्या दाहीनाचा जास्त वापर झाला नसल्यान दाहीनी खराब झाली.
नवीन विद्युतदाहिनी बसवल्यानंतर महीन्याभरात फक्त पाच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून या उलट अंत्यसंस्कारासाठी लाकूड वापरण्यात आले.सरासरी महिन्याकाठी एका ठीकाणी पंचगंगा स्मशानभूमीत 56 – 64 हजार किलो लाकूड तर सरासरी दोन ते पावणे दोन लाख शेणी अंत्यसंस्कारासाठी लागतात व एक मृतदेह जळण्यासाठी 6-7 तास लागतात याउलट विद्युत दाहीनी मध्ये एक मृतदेहांसाठी 1 – दीडतास लागते.
- प्रदुषण विरहित अंत्यसंस्कार
सध्या फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी पालीके कडून याबाबत प्रबोधन करणे गरजेच आहे.कोल्हापूर मधील नागरिकांना अद्याप ही विद्युत दिहीनीमधील अंत्यसंस्कार मान्य नाहीत परंतु संध्या निसर्गा बद्दल जनजागृती वाढत आहे.मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी विद्युत दिहीनीला चांगला प्रतिसाद आहे.तसा कोल्हापूर मध्ये मिळाल्यास पालिकेचा लाक़ुङ व शोणाबर होणारा खच वाचणार आहे.
- पर्यावरणपुरक विद्युतदाहिनी
1 कोठी 20 लाख या विद्युत दाहीनीसाठी खच करण्यात आला असुन पयावरणपुरक विद्युत दाहीनी असुन या पयावरणपुरक विद्युत दाहीनीचा वापर कऊन करवीरवाशीय परयावरण सवधनाला हातभार लावतील.
नेत्रदीप सरनोबत,शहर अभियता








