वार्ताहर/गुंजी
गुंजी परिसरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त या परिसरातील अनेक मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किरावळे डोंगरमाथ्यावरील सर्वात उंच असलेल्या गोरक्षनाथ मंदिरात सकाळी अभिषेक करून मठाचे मठाधीश मंगलनाथजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कलमेश्वर मंदिर गुंजी आणि किरावळे या ठिकाणीही अभिषेक आणि महाआरती करून पूजन करण्यात आले. त्याचबरोबर नवदुर्गा मंदिरातही प्रवचन, कीर्तन आणि गुंजी येथील गुरव कुटुंबीयांच्यावतीने तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. भालके बी. के. येथील कलमेश्वर मंदिरातही भजन, प्रवचन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या सर्व मंदिरात गुंजी परिसरातील शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवून तीर्थप्रसादाचा लाभ घेवून उत्साह दर्शविला.









