बँकॉक :
थायलंडच्या प्राचिनबुरीमध्ये एक टूर बस अनियंत्रित होत दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या बसमधील प्रवासी हे एका स्टडी ट्रिपवर निघाले होते. राजधानी बँकॉकपासून 155 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. थायलंडचे पंतप्रधान पैटोंगटार्न शिनावात्रा यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत पीडित परिवारांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.









