सोल :
दक्षिण कोरियात एक निर्माणाधीन पूल कोसळला आहे. चुंगचेओंग प्रांताच्या चेओनाननजीक सोल-सेजोंग महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. पूलासाठी तयार करण्यात आलेले 50 मीटर लांबीचे 5 स्टील सपोर्ट कोसळले. या पूलाची निर्मिती हुंडई इंजिनियरिंग कंपनी करत आहे. दुर्घटनेनंतर कंपनीने माफी मागितली असून चौकशीत सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.









