आतापर्यंत 20,000 लोकांनी केले बुकिंग
नवी दिल्ली :
कार उत्पादक कियाची नवीन पिढीची एसयूव्ही सिरोस (किया सिरोस) सध्या भारतीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात पसंतीला उतरली आहे. कियाची नवीन सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही सिरोसचे बुकिंग 3 जानेवारीला लाँच झाल्यापासून सुरु झाले आहे. तेव्हापासून आतापर्यंत कारच्या जवळपास 20,163 या पेक्षा अधिक कार बुक झाल्या आहेत. अशा प्रकारे किया सिरोस लोकांना किती प्रमाणात आवडली आहे हे यावरुन सिद्ध होत आहे.
सिरोसची वैशिष्ट्यो : किया सिरोस कार प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट आहे. लूकसह या कारचे डिझाईन देखील खूप आकर्षक आहे. यामध्ये प्रीमियम इंटीरियर, 30 के ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल, ड्यूअल पेन पॅनोरॅमिक सनरुफ, 64 रंगी अॅबियंट लायटिंग, सेगमेट फर्स्ट रियर सीटर रिक्लाइन यासह अन्य फिचर्स गाडीमध्ये आहेत.









