उघड्या पडलेल्या गटारीवरील झाकण त्वरित बसवा; लोकहित मंचाचा रस्ता रोको आंदोलन मनोज भिसे
सांगली
सांगली शहरातील शामराव नगर येथे विकास कामे सुरु आहेत. याअंतर्गत रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारीवर झाकण प्रशासनाने बसवलेले नाही. याकडे गेले सहा महिने प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. यासाठी येथील लोकहित मंचातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
“सांगली शहरातील मुख्य रस्त असलेले हे शामराव नगर आहे. गेले सहा महिने या रस्त्यावर खड्डा पडलेला आहे. या खड्ड्याकडे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांनी दुर्लक्ष केलेले आहे. सांगली महापालिका प्रशासनाला विनंती आहे, की हा खड्डा लवकरात लवकर मुजवावा. शामराव नगर येथील स्थानिक नागरिकांना वेठीस धरण्यासेच काम प्रशासन व अधिकारी करत आहेत. या खड्ड्यामुळे एखाद्याचा बळी गेला तर जबाबदारी कोण घेणार ? प्रशासनाने येत्या काही दिवसात जर हा खड्डा मुजवला नाही तर , शहरातील इतर विकास काम बंद पाडू”, असा इशारा लोकहित मंचाचे मनोज भिसे यांनी यावेळी दिली.
Previous Articleवीज खात्याने इंटरनेट केबल्स कापल्याने इंटरनेट ठप्प
Next Article डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलं गोल्डन कार्ड








