माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांची मागणी
बेळगाव : अनगोळ परिसरातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अनगोळ शेवटच्या बस स्टॉपपर्यंत बस सोडा, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी परिवहनचे विभागीय नियंत्रक अधिकारी राजेश हुद्दार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागील दोन वर्षांपासून अनगोळ शेवटच्या स्टॉपपर्यंत येणारी बससेवा बंद झाली आहे. येथील रस्त्याची दुर्दशा झाल्याने ही बस सेवा बंद झाली होती. मात्र आता रस्ता सुरळीत करण्यात आला असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शेवटच्या स्टॉपपर्यंत बस सोडावी. परिसरातील शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध आणि आजारी प्रवाशांची गैरसोय होत आहे. मागील 50 वर्षांपासून या बस स्टॉपपर्यंत बससेवा उपलब्ध होती. यासाठी येथील प्रवाशांचा विचार करून अनगोळ शेवटच्या स्टॉपपर्यंत बस सोडा. यासाठी अनेकवेळा आंदोलन आणि परिवहनला निवेदने देण्यात आली आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी प्रवाशांच्या सोयीखातर शेवटच्या स्टॉपपर्यंत बससेवा उपलब्ध करा, अशी मागणी करण्यात आली आहे.









