काल रात्री मला कव्हर ड्राईव्ह सदर वाचण्राया एका चाहत्याचा मुंबईतून एक फोन आला. ते म्हणत होते की जमलं तर विराट वरती आणखीन एक लेख करा. मी ताबडतोब त्यांना कुठलाही आढावेढा न घेता हो म्हणालो. काल परवा भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. बघता बघता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी आगपाखड केली की त्यांच्या खेळाडूंवरती. अर्थात हे होणं स्वभाविकच होतं. परंतु हा पराभव करण्यासाठी पुन्हा एकदा श्रीकृष्णासारखा धावुन आला तो ठविराट प्रेम कोहलीठ. आपण त्याला कधी चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन किंवा किंग कोहली अशा वेगवेगळ्या विशेषणाने संबोधतो.
मी दोन दिवसांपूर्वीच्या लेखात म्हटलं होतं की विराट कोहलीच्या क्लास बद्दल आपण काय बोलणार! ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या कसोटी सामन्यात उजव्या यष्टी बाहेर किंवा कव्हर ड्राईव्हचा फटका मारताना त्याची बॅट चेंडूपर्यंत किंवा त्याचं पदलालित्य म्हणावं तेवढं चांगलं होत नव्हतं. विराट आता म्हातारा होत चाललाय असाही सूर उमटू लागला. किंबहुना मायदेशात न्युझीलँड विऊद्ध व्हाईट वॉश आणि कांगारू विऊद्ध 3-1 अशा पराभवास विराट कोहलीचं फलंदाजीतील अपयश कारणीभूत होतं हे नाकारून चालता येणार नाही. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खोर्याने धावा जमवण्राया विराटला आपण कुठे चुकतोय हे निश्चित माहिती असणार. प्रत्येक विदेशी संघ विराट साठी वेगवेगळा सापळा लावताना आपण बघितलयं. कधी कधी तो सापळ्यात अडकलाय तर कधी कधी सापळ्यातून सही सलामत बाहेरही पडलाय. परंतु मागील काही दिवसांपासून उजव्या यष्टीच्या बाहेर जाण्राया चेंडूच्या चक्रव्युहात अडकला होता. त्याचा अभिमन्यू होतो की काय असं वाटत होतं. सरते शेवटी या चक्रव्हिहातून बाहेर पडलाच.तो ही अगदी सही सलामत.
विराटने नेट मध्ये बराच घाम गाळल्यानंतर सुद्धा मागील पाच ते सहा सामन्यात स्पिनर्स विऊद्ध चाच पडताना बघून मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. स्पिनर्स वर दादागिरी करणारे भारतीय खेळाडू चक्क स्पिनर समोर नतमस्तक होतात तेही विराटच्या रूपात ही गोष्टच मुळी पचनी पडत नव्हती. परंतु बॅडपॅच हा जास्त काळ टिकत नाही आणि प्रतिभावंत खेळाडूच्या बाबतीत नियतीही एक पाऊल मागे घेते हे मी ऐकून होतो. काल नियतीनही तथास्तु म्हटले. काल-परवा ज्या पद्धतीने विराटने पाक विऊद्ध ऑफ साईडला कव्हर ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह चे फटके खेळला ते बघून मागचे काही सामने तो चाचपडत होता यावर आपण विश्वासच ठेवू शकत नाही.
विराटचं एक वैशिष्ट्या आहे संबंधित देश तेथील खेळपट्टी याला अनुसरून ऑफ साईडला फटकेबाजी करणे तो पसंद करतो. विशेषत: इंग्लंडमध्ये जिथे चेंडू स्विंग होतो तिथे बॅकफूट खेळणं पसंद करतो. मुंबई क्रिकेट ने भारताला बरेच प्रतिभावंत खेळाडू दिले. परंतु त्याच मुंबईकर दिलीप वेंगसरकर यांनी विराटच्या रूपात भारतीय संघाला कोहिनूर हिरा दिला. मैदानातील आक्रमकतेच्या बाबतीत प्रथम सौरभ गांगुली आणि त्यानंतर विराट कोहलीचं.
विराटने धावांचा पाठलाग करताना बरेच सामने जिंकून दिलेत. परंतु कालचा सामना वेगळा होता. मागील ब्रयाच सामन्यात तो सहाय्यक अभिनेत्याची भूमिका वठवत होता. परंतु त्याला लवकरच मुख्य प्रवाहात येणे गरजेचे होतं. तसा तो आलाही अगदी दिमाखदारपणे. मला पॉपिंग किझ चा राजा का म्हटले जाते हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. फॉरमॅट कुठलाही असो त्याची बॅट तळपतेच. अधून मधून नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर बायको काही दिवस ऊसून बसते तशी त्याची बॅट अबोला धरते खरी. परंतु थोड्या दिवसासाठीच. पुन्हा ती बॅट धावऊपी प्रेमाचा वर्षाव करून निघतेचं.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुऊवातीला सुनील गावस्कर यांनी शतकाची व्याख्या काय असते हे समजवून सांगितल. त्यानंतर ते विस्तृतपणे समजावलं सचिन तेंडुलकर यांनी. आणि यावरती ख्रया अर्थाने कळस चढवतोय तो विराट प्रेम कोहली. मागील काही वर्षात एका शतकाचा आनंद संपल्यानंतर दुसरे शतक दुपारच्या ताटात असायचं. काही महिने हे ताट झुणकाभाकरा सारखं झालं होतं. त्याला कारणही तसेच होतो ते म्हणजे विराटच्या दारिद्र्य रेषेखालच्या धावा. असो.एकंदरीत विराटच्या कालच्या शतकाने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्याला नव संजीवनी मिळणार यात काही शंका नाही. शेवटी विराट कोहली क्रिकेट विश्वाला ओरडून सांगत असेल की ठटायगर अभी जिंदा हैठ!









