वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी इंग्लंडचे माजी प्रशिक्षक मॅथ्यु मॉटची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदी हेमांग बदाणीची नियुक्ती करण्यात आली होती. आता 51 वर्षीय मॉट यांची बदाणीला साथ राहिल. सदर माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रांचायझीनी दिली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षकवर्गामध्ये वेणुगोपाल राव तसेच गोलंदाज प्रशिक्षक मुनाफ पटेल यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख प्रशिक्षक पदाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगवर सोपविण्यात आली होती. मात्र दिल्ली कॅपिटल्सला आतापर्यंत एकदाही आयपीएल क्रिकेट स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर 24 मार्च रोजी विशाखापट्टनम येथे खेळविला जाणार आहे.









