किंमत 19 लाखांच्या पुढे : 6एअरबॅग्जसह अनेक आधुनिक सुविधा
मुंबई :
महिंद्रा कंपनीने स्कॉर्पियो एन कार्बन ही आपली नवी कार नुकतीच भारतीय बाजारात लाँच केली आहे. स्कॉर्पियो झेड 8 आणि झेड 8 एल या दोन गाड्या कंपनीने सादर केल्या आहेत. ऑटोमेटीक आणि मॅन्यूअल ट्रान्समीशनवर चालणाऱ्या या गाड्या असणार आहेत. विविध सुविधा या गाडीत असणार आहेत.
डोअर हँडल्स, फ्रंट ग्रिल, टेल लॅम्पस् आणि आतमध्ये हेडलॅम्प क्लस्टरसारख्या सुविधा या गाडीत असून दोन्ही गाड्यांना एलईडी लाईटच्या इंडीकेटरचा समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त वायरलेस चार्जिंग, 12 स्पिकर सोनी साऊंड सिस्टीम, वायर्ड अँड्रॉइड ऑटो आणि वायरलेस अॅपल कारप्लेसारख्या सुविधासुद्धा देण्यात आल्या आहेत.
सुरक्षितता, किंमत
यामध्ये सुरक्षिततेसाठी म्हणून सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. 2 लिटर पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल या इंधनावर नवी गाडी सादर करण्यात आली असून या गाडीची किंमत 19 लाख रुपयांच्यावर असणार आहे. पार्किंग सेन्सर, हिल डिसेंट कन्ट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरी सिस्टीम, डिस्क ब्रेकसह पार्किंग कॅमेराही गाडीमध्ये समाविष्ट केला गेला आहे.









