महायुतीला इव्हीएम घोळ करायचा होता म्हणून लाडकी बहीण योजना आणली…
लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजना बंद पडल्या, राज्याची तिजोरी आर्थिक अडचणीत…
खासदार प्रणिती शिंदे यांचा सरकारवर आरोप…
सोलापूर
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक प्रकारे मतदाराच्या डोळ्यात धूळफेक करत इव्हीएमचा घोळ करुन लाडकी बहीण योजनेमुळे आम्ही निवडून आलो हे दाखविण्यात आले. महाराष्ट्रची तिजोरी आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहीण योजनेचे ९ लाख लाभार्थी कट होतायत. हे होणार हे माहीतच होते. लाडकी बहीण योजनेकडे पैसे वळविल्याने संजय गांधी योजना, पी एम किसान यासारख्या योजना बंद आहेत. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इतर योजनाचा लाभ मिळणार नाहीत या पातळीवर सरकार पोहचली असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे, असे वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









