पालकमंत्र्यावर टीका करण्यापेक्षा राजन तेलींनी आत्मपरीक्षण करावे ; सुधीर दळवींचे टीकास्त्र
दोडामार्ग – वार्ताहर
पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा राजन तेली यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. सावंतवाडी मतदारसंघांमध्ये राजन तेली यांनी काय दिवे लावले हे येथील जनतेला माहिती आहे आणि म्हणूनच त्यांना येथील जनतेने तीन वेळा या मतदारसंघातूनच हद्दपार केले आहे अशी जोरदार टीका भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केली आहे. श्री. दळवी यांनी पुढे म्हटले की, नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचा राजन तेली यांना नैतिक अधिकार नाही. त्यांनी प्रथम आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. कोणाकोणाची फसवणूक केली. सावंतवाडी मतदारसंघांमध्ये गटातटाचे कसे राजकारण केले. आणि तालुक्या – तालुक्यात वाद निर्माण करणा-या राजन तेलीनी पालकमंत्री राणेंवर नाहक टीका करु नये. त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी प्रथम ज्यांची फसवणूक केली आहे. त्यांची फसवणूक दूर करावी. स्वतः कर्म करावे अन दुस-यावर बोट दाखवावे हे तेली यांना शोभत नाही. नितेश राणे पालकमंत्री झाल्यावर जनतेच्या आशा वाढलेल्या आहेत. अनेक प्रश्न सुटत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने बेताल वक्तवे करत आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील जनतेने तीन वेळा नाकारल्याने राजन तेली यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करु नये न पेक्षा राजन तेली यांचे खरे रूप जनतेसमोर आणायला वेळ लागणार नाही असे प्रसिद्धी दिलेल्या प्रत्रकात भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी म्हटले आहे.









