चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता ऋषभ शेट्टी आता नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे. ऋषभने या चित्रपटाचे नवे पोस्टर जारी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ योद्धा नव्हे तर स्वराज्याचे आत्मा होते, साहस, ज्ञान आणि भक्तिचे प्रतीक होते. मोठ्या पडद्यावर त्यांच्या भावनेला मूर्त रुप देणे एक दिव्य आव्हान आहे, हा प्रवास शब्दांच्या पलिकडचा आहे. मी त्यांच्या अद्वितीय वारशासोबत न्याय करू शकेन आणि प्रत्येक भारतीयांच्या त्यांच्या शौर्याची जाणीव करू देऊ शकेन अशी अपेक्षा आहे, असे उद्गार ऋषभने काढले आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सिंह करणार आहेत. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ऋषभ शेट्टीचा कांतारा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आगामी काळात तो कांतारा प्रीक्वेल आणि जय हनुमान या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.









