वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीत आतापर्यंत म्हणजेच 21 फेब्रुवारी पर्यंत 23 हजार 710 कोटी रुपये काढलेले आहेत. जागतिक व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवरती विदेशी गुंतवणूकदार सध्याला सावधगिरी बाळगत आहेत.
भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदारांच्या सकारात्मकतेबाबत तज्ञांना विचारले असता आर्थिक विकास आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यामध्ये झालेल्या वाढीनंतर गुंतवणूकदार बाजारात परततील असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये वरील बाबतीमध्ये सकारात्मकता राहील असेही तज्ञांनी नोंदवून ठेवले आहे. गुंतवणूकदारांच्या नकारात्मकतेमुळे बाजारामध्ये काहीसा चढ-उतार पहायला मिळतो आहे. निफ्टी निर्देशांक चार टक्के घसरणीत असलेला पाहायला मिळाला आहे.









