वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असणाऱ्या बॅटरीच्या निर्मितीमध्ये आता कायनेटिक समूह लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात आहे. कायनेटिक इंजिनियरिंग यांनी ही माहिती शेअरबाजाराला दिली. शेअर बाजाराला माहिती देताना कंपनीने बॅटरी निर्मिती प्रकल्पामध्ये आपण उतरत असल्याचे म्हटले आहे. ऑटोमेटिव्ह कंपोन्टंट क्षेत्रामध्ये दिग्गज समूह म्हणून कायनेटिक समुहाचा उल्लेख केला जातो. अहमदनगर येथे बॅटरी निर्मिती कारखाना तयार झाल्याची घोषणा त्यांनी केली असून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. वर्षाला 60 हजार बॅटरी निर्मितीचे लक्ष कंपनीचे आहे. दुचाकी आणि तिन चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी सुरुवातीला तयार केल्या जातील.









