वृत्तसंस्था/ रावळपिंडी
चॅम्पियन्स ट्रॉफी ‘गट अ’मधील आज सोमवारी येथे होणाऱ्या बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात आत्मविश्वास वाढलेला न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असेल. त्यांनी यजमान पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव करून आपल्या मोहिमेची सुऊवात प्रभावी पद्धतीने केली आहे. या दमदार विजयामुळे ते 1.200 च्या ‘नेट रन रेट’सह ‘गट अ’मध्ये अव्वल स्थानावर पोहोचले. आज सोमवारी विजयी मिळविल्या ते उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या जवळ पोहोचतील.
दुसरीकडे, बांगलादेशला भारताकडून सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला आहे आणि उणे 0.408 च्या नेट रन रेटसह गटात तिसऱ्या स्थानावर आहेत. बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना आज विजय मिळवावा लागेल. न्यूझीलंडला तिरंगी मालिकेतील त्यांच्या अलीकडच्या विजयामुळे पाकिस्तानमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत झाली आहे. तथापि, आता त्यांच्यासमोर निवडीचा प्रश्न आहे. कारण रचिन रवींद्र दुखापतीतून परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग यांनी डावाची सुऊवात केली होती.
सुऊवातीला रवींद्र यंगची जागा घेण्याची अपेक्षा होती, परंतु पाकिस्तानविऊद्ध यंगने केलेल्या शतकामुळे निर्णय गुंतागुंतीचा झाला आहे. शिवाय यंगने फिरकी गोलंदाजी प्रभावीपणे हाताळण्याची त्याची क्षमता सातत्याने सिद्ध केली आहे. त्याला वगळल्यास सलामीला डावखुऱ्या व उजव्या फलंदाजांची जोडी खेळविण्याचे समीकरण बिघडेल. ते न्यूझीलंडच्या रणनीतीसाठी महत्त्वाचे ठरू शकते.
दुसरीकडे, कॉनवे त्याचा फॉर्म परत मिळवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याव्यतिरिक्त न्यूझीलंड संघात आणखी बदल करण्याची शक्यता नाही. तथापि, बांगलादेशसमोर भारताविऊद्धच्या निराशाजनक पराभवानंतर पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. मागील सामन्यात त्यांच्या फलंदाजीने संघर्ष केलेला असल्याने त्यांच्या टॉप ऑर्डरवर कामगिरी करण्यासाठी दबाव असेल. त्या सामन्यात जर जाकेर अली आणि तौहिद हृदॉय यांनी सहाव्या गड्यासाठी 154 धावांची भागीदारी केली नसती, तर बांगलादेशला 100 धावांपर्यंत पोहोचणेही कठीण झाले असते.
नाणेफेक जिंकूनही नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखालील संघाला फायदा उठवता आला नाही आणि त्यांची सुऊवात खराब झाली. त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण बचाव करण्यासाठी धावा कमी पडल्या. त्यांच्या अडचणीत भर घालत ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे त्यांना मौल्यवान संधी गमवाव्या लागल्या आणि जर त्यांना न्यूझीलंडसारख्या दर्जेदार संघाला आव्हान द्यायचे असेल, तर त्यांना त्या क्षेत्रात लक्षणीय सुधारणा कराव्या लागतील.
संघ : न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्झिद हसन, तौहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम, एम. डी. महमूद उल्लाह, जाकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ होसाई इमॉन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, नाहिद राणा.









