नरेंद्र मोदी, ट्रम्प यांचा उल्लेख : उजव्या विचारसरणीच्या नेत्यांवर जनतेचा विश्वास
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पूर्ण जगातील डाव्या विचारसरणीच्या तसेच कथित उदारमतवादी नेत्यांना ढोंगी ठरविले आहे. जगभरात नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि माझ्यासारख्या कॉन्झर्व्हेटिक नेत्यांच्या उदयामुळे लिबर नेटवर्क उन्मादाने भरला असल्याची टिप्पणी मेलोनी यांनी केली आहे.
90 च्या दशकात बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेयर यांनी ग्लोबल लेफ्टिस्ट नेटवर्क निर्माण केले होते, तेव्हा त्यांना स्टेट्समॅन म्हटले गेले. परंतु आता ट्रम्प, मेलोनी, मिलई आणि मोदींबद्दल बोलले जाते, तेव्हा हेच लोक त्यांना लोकशाहीसाठी धोका ठरवतात. हा डाव्यांचा दुटप्पणीपणा असून आम्हाला याची सवयच झाली आहे. परंतु आता लोक देखील डाव्यांच्या असत्यावर विश्वास ठेवत नाहीत ही एक चांगली गोष्ट आहे. डाव्यांनी आमच्यावर कितीही चिखलफेक केली तरीही लोक आम्हालाच मतदान करतात असे मेलोनी म्हणाल्या.
डावे नेते हताश
मेलोनी यांनी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्समध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे भाग घेतला. यात बोलताना त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी वेंस यांचे कौतुक केले. उदारमतवादी उजव्या विचारसरणीचे नेते पुढे जात असल्याने डावे नेते हताश आहेत. विशेषकरून ट्रम्प हे व्हाइट हाउसमध्ये परतल्यापासून हा प्रकार वाढला आहे. डावे नेते घाबरले असून ट्रम्प यांच्या विजयासोबत त्यांचा चिडचिडेपणा मूर्खतेत बदलला आहे. केरळ रुढिवादी जिंकत नसून रुढिवादी आता जागतिक स्तरावर सहकार्य करत असल्याने हे घडत असल्याचा दावा मेलोनी यांनी केला आहे.
ट्रम्प मजबूत नेते
मेलोनी यांनी ट्रम्प यांना मजबूत नेते म्हणत त्यांचे समर्थन केले. ट्रम्प अध्यक्ष झाल्याने रुढिवादी आंदोलनाला तडा जाईल ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. अध्यक्ष ट्रम्प हे आमच्यापासून दूर जातील अशी अपेक्षा आमच्या विरोधकांना आहे. परंतु ट्रम्प यांना एक मजबुत अन् प्रभावी नेते म्हणून ओळखत असल्याने जे लोक विभाजनाची अपेक्षा करत आहेत ते चुकीचे ठरतील यात शंका नसल्याचे उद्गार मेलोनी यांनी काढले आहेत.
सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता
युरोपमध्ये सुरक्षा आता सर्वोच्च प्राथमिकता असल्याची जागरुकता वाढत आहे. जर कुणाकडे असे करण्यासाठी साधन किंवा साहस नसेल तर तो स्वातंत्र्याचे रक्षण करू शकत नाही. चार वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात पाहिलेली आपत्ती आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात पुन्हा अनुभवणार नाही हे मला माहित आहे. युक्रेनचे लोक स्वातंत्र्याच्या लढाईकरता एकजूट आहेत. आम्ही स्थायी शांततेसाठी मिळून काम करत आहोत. ही शांती सर्वांच्या योगदानातूनच प्रस्थापित होऊ शकते असे मेलोनी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष वेन्स यांच्या वक्तव्याचा बचाव केला. वेन्स यांनी युरोपला सर्वात मोठा धोका अंतर्गत असल्याचे वक्तव्य केले होते. अंतर्गत धोक्याबद्दल उजव्या विचारसरणीचे नेते उघडपणे बोलत असल्याने डावे नेते गोंधळून गेले आहेत असा दावा मेलोनी यांनी केला.









