बेळगाव :
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या 98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडी निघाली. या दिंडीमध्ये बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व आरपीडी येथील प्रा. महादेव खोत यांनी केले. संसदेपासून ही दिंडी निघाली, ज्यामध्ये खोत सहभागी झाले. याबरोबरच ‘अशी का वागतात माणसं’ ही त्यांची कविताही रविवार दि. 23 रोजी होणाऱ्या कवी कट्टा या काव्य मंचावर सादर करण्यासाठी निवडण्यात आली आहे. पुण्याच्या सरहद संस्थेने या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले आहे.









