विशेष प्रतिनिधी/ नवी दिल्ली
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. या कार्यक्रमास अजितदादा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित राहणार आहेत
या संमेलनात अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावलेली आहे. रविवारी महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले असून दोन्ही नेत्यांनी येण्याचे मान्य केले आहे. या कार्यक्रमास डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी. डी. पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार विजय दर्डा हे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4.30 ते 8 या दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव तसेच साहू अखिलेश जैन, ग्रेटर काश्मीरचे फैयाज कल्लू इत्यादींचा सत्कार करण्यात येणार आहे.









