इंजिप्तमध्ये पहावयास मिळणारी आणि जगातल्या आठ आश्चर्यांमध्ये गणली जाणारी पिरॅमिडस् नेमकी कोणत्या उद्देशांसाठी बांधण्यात आली होती, या संबंधी नुकतेच एक मौलिक संशोधन करण्यात आले आहे. आपल्या समजुतीनुसार या भव्य पिरॅमिडस्ची निर्मिती प्रचीन काळातील सम्राटांच्या मृतदेहांचे जतन करण्यासाठी साकारण्यात आली होती. तथापि, या समजुतीला धक्का देणारे हे संशोधन आहे. पिरॅमिडस्संबंधी अनेक संशोधने झाली आहेत. त्यांच्या अनेक रहस्ये या संशोधनांमधून उकलण्यात आली आहेत. तथापि, या नव्या संशोधनाचे निष्कर्ष सर्वाधिक आश्चर्यकारक असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.
ही पिरॅमिडस् केवळ मृतदेहांचे जतन करण्यासाठी उपयोगात आणली जात नव्हती. तसेच ती केवळ या एकाच उद्देशाने यांची रचनाही करण्यात आली होती. तर ती ऊर्जेच्या साठवणुकीसाठी निर्माण करण्यात आली होती, असे या संशोधनातून समोर आले आहे. त्यांचा उपयोग ऊर्जास्रोत किंवा ऊर्जा निर्मिती केंद्रे (पॉवर प्लँटस्) म्हणून करण्यात येत होता. हे संशोधन इलेक्ट्रोमॅग्नेटिक साधनांच्या साहाय्याने करण्यात आले आहे. जेव्हा ही साधने या पिरॅमिडस्साठी उपयोगात आणण्यात आली, तेव्हा संशोधकांना अद्भूत परिणाम दिसून आले. पिरॅमिडस्च्या काही भागांमध्ये या साधनांमधून बाहेर पडणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग शोषले गेले आहेत, असे संशोधकांना आढळून आले. ऊर्जानिर्मिती करणाऱ्या केंद्रांमध्येही असेच घडत असते. त्यामुळे ही पिरॅमिडस् प्रचीन काळातील ऊर्जानिर्मिती केंद्रे असावीत. पण पुढे त्यांचा उपयोग बंद पडल्याने त्यांच्या या क्षमतेचा ऱ्हास झाला असावा, असे संशोधकांचे मत आहे. निवृत्त अवकाश संशोधक ख्रिस्तोफर डून यांनी या निष्कर्षांना दुजोरा दिला आहे. या पिरॅमिडस्च्या मधल्या कक्षात काही रसायनांच्या मिश्रणावर प्रक्रिया केली जात असे. या प्रक्रियेतून ऊर्जा म्हणून उपयोग होऊ शकेल अशा हैड्रोजनची निर्मिती होत असे. या ऊर्जेचा उपयोग सर्वसामन्य नागरीकांकडूनही केला जात असे, असा संशोधकांचा कयास आहे. गेली 30 वर्षे यासंबंधी संशोधन केले जात आहे. प्राचीन काळातही इजिप्तमध्ये उच्च वास्तू निर्मिती तंत्रज्ञानाचा विकास झाला होता आणि पिरॅमिडस्ची निर्मिती याच उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काटेकोरणे करण्यात आली आहे. आजही ऊर्जानिर्मितीचे नवे तंत्रज्ञान पिरॅमिडस्च्या अभ्यासातून हाती येईल अशी शक्यता आहे.









