पाच लाखाचा धनादेश सुपूर्द
खानापूर : खानापूर तालुक्यातील लक्केबैल येथील शेतकरी रामचंद्र चंद्रकांत अंधारे ( वय 23) याचा 2022 साली शेताकडे जात असताना तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला होता. याबाबत खानापूर पोलिसात घटनेची नेंद करण्यात आली होती. हेस्कॉमकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. हेस्कॉमने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसदाराना 5 लाखाचा निधी मंजूर केला होता. या निधीचा धनादेश रामचंद्र यांचे वडील चंद्रकांत अंधारे यांना आमदार विठ्ठल हलगेकर आणि हेस्कॉम खानापूर विभागाचे अभियंते जगदीश मोहीते यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी हेस्कॉमचे अभियंता रंगनाथ, नमीत ईजारी, भरतेश नांगणूर, निरंजन सरदेसाई, सहाय्यक संचालिका रूपाली बडकुंद्री तसेच नागरिक उपस्थित होते.









