वृत्तसंस्था / डोहा
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या कतार खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रुब्लेव्हने मिनॉरचा 6-1, 3-6, 7-6 (8-6) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. रुब्लेव्हने या स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली असून त्याने 2020 साली या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत सहभागी झालेला रशियाचा आंद्रे मेदव्हेदेव याला अन्नातून विषबाधा झाल्याने त्याने माघार घेतली आहे. त्यामुळे कॅनडाच्या अॅलिसिमेला पुढे चाल मिळाली आहे.









